प्राधिकरणाचा अध्यक्ष हा , प्राधिकरणाच्या वतीने सर्व कार्याचे पर्यवेक्षण आणि नियंत्रण करील आणि या अधिनियमाद्वारे त्याला प्रदान करण्यात आलेले असतील अशा अधिकारांचा वापर करील व अशी कर्तव्ये पार पाडील आणि प्राधिकरण वेळोवेळी विनियमांद्वारे निर्धारित करील अशा अन्य अधिकारांचा वापर करील .